India’s lunar mission Chandrayaan-3 achieves another milestone
भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 ने आणखी एक मैलाचा दगड गाठला
चांद्रयान-३ च्या विद्युत चुंबकीय आणि विद्युत चुंबकीय योग्यते बाबतच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण
बंगळुरू : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 ने आणखी एक मैलाचा दगड गाठला. अवकाशातील उपग्रहाच्या कार्यप्रणालीवरील महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली
भारताच्या चंद्र मोहिमेला चालना देण्यासाठी, चांद्रयान-3 ने EMI-EMC (इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंटरफेरन्स/ इलेक्ट्रो-मॅग्नेटिक कॉम्पॅटिबिलिटी) यशस्वीरित्या पार पाडले आहे. अवकाश वातावरणातील उपग्रह उपप्रणालींची कार्यक्षमता आणि अपेक्षित इलेक्ट्रोमॅग्नेटिक पातळींशी त्यांची सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी EMI-EMC चाचणी उपग्रह मोहिमांसाठी घेतली जाते.
भारताच्या चांद्र मोहिमेला चालना देण्यासाठी चांद्रयान-३ च्या विद्युत चुंबकीय आणि विद्युत चुंबकीय योग्यते बाबतच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. बंगळुरू इथल्या यु. आर. राव उपग्रह केंद्रामध्ये ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान या चाचण्या करण्यात आल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल घोषित केलं.
अंतराळामधल्या संभाव्य विद्युत चुंबकीय स्तरांशी जुळवून घेऊन या उपग्रहाच्या प्रणाली योग्य पद्धतीने काम करतील, याची खात्री करून घेण्यासाठी ही चाचणी करण्यात आली.
उपग्रह निर्मितीमधला हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं इस्रोनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या चाचणी दरम्यान, चंद्रयानाच्या लँडिंग मिशन नंतरच्या टप्प्याशी संबंधित अनेक बाबींची पडताळणी केली असून, यामध्ये प्रक्षेपण योग्यता, रेडियो लहरींच्या सर्व प्रणालींसाठी अँटिनाचं ध्रुवीकरण या आणि अन्य गोष्टींचा समावेश असल्याचं यात म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com