शिंदे गटाला ‘खरी’ शिवसेना मानणाऱ्या आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी 

Uddhav Thackeray and Eknath Shinde उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The Supreme Court will hear Uddhav’s plea challenging the commission’s order that the Shinde faction is considered the ‘real’ Shiv Sena.

शिंदे गटाला ‘खरी’ शिवसेना मानणाऱ्या आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या उद्धव यांच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना आणि धनुष्यबाण या संदर्भातल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या दुपारी सुनावणीUddhav Thackeray and Eknath Shinde उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे आणि त्यांनाच शिवसेना हे पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे.

ठाकरे गटातर्फे वरिष्ठ अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर बाजू मांडत ही याचिका तातडीनं सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंती आज केली. त्यावर सरन्यायाधीशांनी उद्या सुनावणी घेण्याचं मान्य केलं.

आपल्या याचिकेत ठाकरे यांनी असा युक्तिवाद केला की शिंदे यांच्या समर्थकांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने निवडणूक आयोग विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहू शकत नाही. अपात्र ठरल्यास शिंदे गटाला विधानसभेत बहुमत मिळणार नाही, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगानं दोन्ही गटांची संस्थात्मक ताकद न आजमावता विधिमंडळ आणि संसदेतल्या संख्याबळावरून आदेश दिला. विधानसभेत शिंदे गटाचे ४० तर उद्धव ठाकरे गटाचे १५ सदस्य आहेत. लोकसभेतही शिवसेनेच्या १८ सदस्यांपैकी १३ सदस्य शिंदे गटाचे तर फक्त ५ उध्दव ठाकरे गटाचे सदस्य आहेत.

आता सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवणार की ठाकरे गटाला दिलासा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *