मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी फिल्मबाजार पोर्टल

Minister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Filmbazaar portal for the development of Marathi movies, serials and the OTT sector

मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी फिल्मबाजार पोर्टल

मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल 24/7 आणि 365 दिवस सुरु राहिल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठितMinister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक समितीचे अध्यक्ष असतील, तर स्वप्नील जोशी, संदीप घुगे, केतन मारु या समितीचे सदस्य असतील.

मराठी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध चॅनलच्या मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार इत्यादींना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक साह्य इत्यादी बाबी समितीच्या कार्यकक्षेत येतील.

राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, इतर महत्वाचे समाजसुधारक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती इत्यादींच्या जीवनावर आधारी चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब मालिका इत्यादी निर्मितीसाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही नियुक्त समिती करणार आहे.

मराठी निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बँकांकडून कमीत कमी दरात हमी मिळेल का याबाबतही अभ्यास करणे. भौतिकरित्या होणाऱ्या फिल्मबाजार पद्धतीचा अभ्यास करुन ऑनलाईन पोर्टल तयार करण्याबाबतचा आराखडा शासनास सादर करणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती/ संस्था यांच्याशी समन्वय करणे हे काम समिती करेल. याशिवाय पोर्टल तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विकासक यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधण्याचे काम करेल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *