Inauguration of G-20 meeting on women at Chhatrapati Sambhaji Nagar
छत्रपती संभाजी नगर इथं जी-२० च्या महिला विषयक बैठकीचं उद्घाटन
छत्रपती संभाजी नगर इथं जी-२० च्या महिला विषयक बैठकीचं केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजी नगर : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज छत्रपती संभाजी नगर इथं W२०, अर्थात वीमेन-२० समूहाच्या दोन दिवसीय प्रारंभिक बैठकीचं उद्घाटन केलं.
भारताच्या जी-२० अध्यक्षते अंतर्गत सहभाग आणि चर्चेसाठीचा W२० हा एक अधिकृत गट आहे. उद्घाटन समारंभाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भगत किशनराव कराड यांच्यासह भारताचे G२० शेर्पा अमिताभ कांत, तुर्कतान W२० चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्डेन आणि W२० इंडोनेशिया २०२२ चे अध्यक्ष उली सिलाही, यावेळी उपस्थित होते.
G-२० सदस्य देशांच्या जवळजवळ दीडशे महिला प्रतिनिधी, अतिथी देश आणि विशेष निमंत्रित या प्रारंभिक बैठकीत सहभागी होत आहेत. या बैठकीत पाच पॅनल चर्चासत्र आणि दोन विशेष चर्चा सत्र आयोजित केली जातील, अशी माहिती डब्ल्यू-२० गटाच्या अध्यक्ष आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी दिली.
भारतीय नौदल, तळागाळातली उद्योजकता यासारख्या महिलांसाठी अडथळा ठरणाऱ्या अपारंपरिक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा उपस्थित प्रतिनिधींसमोर सादर केल्या जातील.
Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com