नाफेडमार्फत कांदा खरेदीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मंजुरी

Union Ministry of Commerce approves procurement of onion through NAFED नाफेडमार्फत कांदा खरेदीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मंजुरी हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Union Ministry of Commerce approves procurement of onion through NAFED

नाफेडमार्फत कांदा खरेदीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मंजुरी

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी   -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Union Ministry of Commerce approves procurement of onion through NAFED नाफेडमार्फत कांदा खरेदीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मंजुरी हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे घसरलेले भाव आणि गावोगावच्या शेतकऱ्यांकडून होत असलेली आंदोलनं लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं नाफेडमार्फत कांदा खरेदीला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल दिली.

राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक आल्यानं भाव घसरल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भारती पवार यांची भेट घेऊन नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदीची मागणी केली. त्यानुसार डॉ. भारती पवार यांनी ही बाब केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर लाल कांदा खरेदीला परवानगी मिळाल्याचं पवार यांनी सांगितलं. याआधी गोयल यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी नसल्याचं टिवी्ट केलं होतं.

लासलगाव इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेलं आंदोलन अखेर बंदरे आणि खणिकर्म मंत्री पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर तब्बल ९ तासांनी मागे घेण्यात आलं. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून येत्या सात दिवसात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कांद्याला जोपर्यंत किमान ३० रुपये प्रति किलो भाव मिळणार नाही, तोपर्यंत उत्पादक आपला कांदा विकणार नाहीत, अशी भूमिका घेत काल सकाळी लासलगाव बाजार समितीत सकाळी सुरू झालेले लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले होते.

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी   -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *