5G टेस्ट बेड विनामूल्य वापरण्याची सरकारकडून संधी

Prime Minister Modi will launch 5G services tomorrow that will provide high-speed seamless coverage पंतप्रधान मोदी उद्या हाय-स्पीड सीमलेस कव्हरेज देणारी 5G सेवा लॉन्च करणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Opportunity from the government to use 5G test bed for free

जानेवारी 2024 पर्यंत मान्यताप्राप्त स्टार्ट-अप आणि सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना 5G टेस्ट बेड विनामूल्य वापरण्याची सरकारकडून संधीPrime Minister Modi will launch 5G services tomorrow that will provide high-speed seamless coverage पंतप्रधान मोदी उद्या हाय-स्पीड सीमलेस कव्हरेज देणारी 5G सेवा लॉन्च करणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्‍ली : भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त स्टार्ट-अप आणि एमएसएमईंना अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना,केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दूरसंचार विभागाने (DoT), जानेवारी 2024 पर्यंत फाईव्ह जी(5G) टेस्ट बेडचा विनामूल्य वापर करण्याची संधी दिली आहे.

सर्व फाईव्ह जी (5G) भागधारक म्हणजे उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा प्रदाते, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था, उपकरणे निर्माते हे अत्यल्प दरात या सुविधेचा वापर करू शकतात.

टेस्ट बेडच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनातून स्वदेशी तंत्रज्ञान/उत्पादनांच्या विकासाला चालना देण्यासाठी ही घोषणा केली आहे. अनेक स्टार्ट-अप आणि कंपन्या याआधीच त्यांची उत्पादने आणि सेवांच्या चाचणीसाठी टेस्ट बेडचा वापर करत आहेत.

मार्च, 2018 मध्ये, भारताच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आणि 5G चा वापर सुरू करण्यात पुढाकार घेण्यासाठी, दूरसंचार विभागाने भारतात ‘स्वदेशी 5G टेस्ट बेड’ स्थापित करण्यासाठी बहुविध-संस्थांना सहयोगी प्रकल्पासाठी एकूण रु. 224 कोटी इतके आर्थिक अनुदान मंजूर केले होते.

भारतातील शैक्षणिक आणि उद्योगातील संशोधन आणि विकास ( R&D) संस्थांना त्यांची उत्पादने, प्रोटोटाइप, अल्गोरिदम प्रमाणित करण्यासाठी आणि विविध सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी स्वदेशी 5G टेस्ट बेड एक खुला 5G चाचणी बेड प्रदान करून सक्षम करते.याशिवाय हे संशोधन विविध कार्यसमूहांना भारतात आणि जागतिक स्तरावर प्रमाणिकरणाची क्षमता असलेल्या नवीन संकल्पनांवर/नवविचारांवर काम करण्याची संधी प्रदान करते.

या स्वदेशी टेस्ट बेडचा विकास हा भारताला 5G तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी आणि आता 5G हा भारताला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

हा टेस्ट बेड भारतीय स्टार्ट-अप, एमएसएमई, आर अँड डी, शैक्षणिक संस्था आणि उद्योगातील वापरकर्त्यांद्वारे विकसित आणि उत्पादित केल्या जाणार्‍या 5G उत्पादनांची चाचणी आणि प्रमाणीकरण यासाठी स्वदेशी क्षमता प्रदान करत आहे. याचा परिणाम म्हणून,खर्चात प्रचंड बचत होऊन कमी वेळेत ही डिझाईन्स तयार झाली आहेत,ज्यामुळे भारतीय 5G उत्पादने जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे.

Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *