नीट आणि अन्य सामायिक प्रवेश परीक्षा 2021 परीक्षा अनुक्रमे 11सप्टेंबर, 2021 आणि 12 सप्टेंबर 2021.
नीट ( NEET) आणि इतर सामायिक प्रवेश परीक्षा स्थगित करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. नीट – (पीजी) आणि नीट – (यूजी) 2021 परीक्षा अनुक्रमे 11सप्टेंबर, 2021 आणि 12 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
परीक्षा योग्य सावधगिरीने आणि कोविड योग्य वर्तनासह सर्व प्रोटोकॉलचे पालन करून घेण्यात येईल. तसेच परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी उमेदवार आणि परीक्षा कर्मचार्यांसाठी पुढील अतिरिक्त सुरक्षात्मक उपाय सुचवण्यात आले आहेत :
1.उमेदवारांची होणारी गर्दी आणि त्यांना करावा लागणारा लांबचा प्रवास टाळण्यासाठी देशभरात परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.
2.उमेदवारांना सहजपणे प्रवास करता यावा यासाठी प्रवेशपत्रांबरोबर कोविड ई-पास देण्यात आला आहे.
3.परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश आणि निर्गमनासाठी योग्य स्वतंत्र व्यवस्था
4.सर्व उमेदवारांचे प्रवेशाच्या ठिकाणी तापमान तपासण्यात येईल. सामान्य तापमानापेक्षा अधिक अधिक तापमान आढळणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र वेगळ्या प्रयोगशाळेत परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल.
5.उमेदवारांसाठी फेस मास्कचा वापर अनिवार्य असेल आणि त्यांना फेस गिल्ड, फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर असलेले सेफ्टी किट देण्यात येईल.
6.परीक्षा केंद्राबाहेर गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
कला आणि विज्ञान संदर्भात परीक्षांचे क्षेत्र संबंधित विद्यापीठे / राज्ये यांचेकडे आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.