गॅस आणि वीज दरवाढीवरुन विधानसभेत विरोधी पक्षांचा गदारोळ

Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Opposition parties rioted and walked out of the assembly over gas and electricity tariff hike

गॅस आणि वीज दरवाढीवरुन विधानसभेत विरोधी पक्षांचा गदारोळ आणि सभात्याग

महविकास आघाडीच्या सरकारनं मूल्यवर्धित कर कमी केला नव्हता असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तरNCP State President Jayant Patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ‘शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा’ आणि शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी निदर्शने केली.

स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरवरचा मूल्यवर्धित कर कमी करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी अधिवेशनापर्यंत तोडू नये, त्यानंतर तोडावी असे आदेश सरकारनं दिल्याचा आरोप त्यांनी केला.

‘पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तेव्हा कोरोनाचा काळ होता. त्यावेळी केंद्र सरकारने दिलासा दिला होता इतर राज्यांनी दर कमी केले, पण तुम्ही जनतेला दिलासा दिला नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही तत्काळ दिलासा दिला. केवळ राजकीय विधाने करून आणि माध्यमांत येण्यासाठी बेताल आरोप करून तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकत नाही’ असे स्पष्टीकरण देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना उत्तर दिले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

याप्रकरणी महविकास आघाडीच्या सरकारनं मूल्यवर्धित कर कमी केला नव्हता असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ करत सभात्याग केला. नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघानं तीन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून दहा ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली आहे.

या कंपन्यांनी बाजार समितीत कांदा खरेदी केंद्रं सुरू केली नसतील तर त्यांना बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देऊ, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत नाफेड मार्फत १८ हजार ७४३ क्विंटल कांदा खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं.

या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही ते म्हणाले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान खरेदी ची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

वन पट्टे धारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार आहे, त्यापैकी सतरा हजार जणांची नोंदणी आँनलाईन पध्दतीने झाली आहे. उर्वरित नोंदणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मारहाण झाल्याप्रकरणी संबधित प्राध्यापक निलंबित करण्यात आला आहे, त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यावर विद्यापीठाने पुढे काय कारवाई केली याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली, हा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *