Technology and Skills are the two important pillars that will transform the future of Young India: Shri Rajeev Chandrasekhar
युवा भारताचे भविष्य परिवर्तित करणारे दोन महत्वाचे स्तंभ म्हणजे तंत्रज्ञान आणि कौशल्य
– राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हाच्या, म्हणजे 2014 पूर्वीच्या आणि 2014 नंतरच्या भारताची तुलना केली आणि म्हणाले की, देश आज अशा वळणावर आहे जो – त्याच्या इतिहासातील सर्वात उत्साहवर्धक कालावधी आहे.
“स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात याआधी तरुण भारतीयांसाठी इतक्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या नव्हत्या,” असे मंत्री म्हणाले. युवा भारत शृंखलेत नव्या भारताचा भाग म्हणून गाझियाबाद्च्या एचआरआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स मधील विद्यार्थ्यांसमवेत एका सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
गेल्या आठ वर्षांतील भारताच्या प्रगतीविषयी काही ठळक मुद्दे सांगताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, “आज तरुण भारतीय भारताच्या तंत्रज्ञान युगात देशाच्या प्रगतीला चालना देत आहेत. 110 युनिकॉर्नसह 90,000 हून अधिक स्टार्टअप्स आहेत, ज्यामध्ये युवा भारतीयांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी कोणाच्या शिफारशीतून किंवा प्रसिद्ध आडनावामुळे नव्हे तर त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे यश मिळवले आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पदवी व्यतिरिक्त त्यांच्या आवडीचे काही कौशल्य कार्यक्रम हाती घेण्यास प्रोत्साहन दिले, ते म्हणाले, तंत्रज्ञान आणि कौशल्ये हे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत जे तरुण भारताचे भविष्य बदलतील.
‘न्यू इंडिया फॉर यंग इंडिया’ ही राजीव चंद्रशेखर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या संवादांची मालिका आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल आणि उद्योजकता क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा केली जाते.
मंत्री महोदयांनी गेल्या 18 महिन्यांत भारतभरातील 43 शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आणि भारतातील युवा भारतीयांशी संवाद साधला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com