Ban on sale of gold jewellery without hallmark from next month
हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर पुढच्या महिन्यापासून बंदी
हॉलमार्क नसलेले दागिने नसतील वैध
हॉलमार्किंग नसलेल्या तुमच्याकडील जुन्या दागिन्यांचं काय ?
नवी दिल्ली : सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना शुद्धतेची हमी देणाऱ्या हॉलमार्किंगबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहा आकडी कोड नसलेल्या हॉलमार्क सोन्याचे दागिने आणि सोन्याची इतर कलाकुसर यांच्या विक्रिवर पुढील महिन्यापासून (३१ मार्च २०२३) बंदी आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे. सूक्ष्म उद्योगांमध्ये प्रत टिकून राहावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
सोन्याचे दागिन्यांवर ६ अंकी कोड असलेल्या हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही . ग्राहक हिताच्या दृष्टीने ग्राहक व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३१ मार्च नंतर हॉलमार्क नसलेले सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार नाही.
हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर, देशात फक्त बीआयएस हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने आणि कलाकृती यांची विक्री केली जाईल. हे सोने १४, १८ आणि २२ कॅरेटमध्ये असेल . नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने ग्राहकाने ज्या कॅरेटचे पैसे दिले आहेत त्याच कॅरेटचे असतील.
हॉलमार्किंग नसलेल्या तुमच्याकडील जुन्या दागिन्यांचं काय?
BIS च्या हॉलमार्किंगअंतर्गत सोनारांना हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी क्रमांक दिला जातो. तुमच्याकडे जुने दागिने असून त्यावर हॉलमार्किंगचे चिन्ह नसले तरीही सोनार असे सोने खरेदी करू शकतात. हॉलमार्किं फक्त सोनारांसाठी अनिवार्य आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बी आय एस अर्थात भारतीय मानक ब्युरोनं काल घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्पादनाची प्रत टिकून रहायला प्रोत्साहन मिळावं यासाठी उत्पादन प्रमाणीकरण फी मध्ये बी आय एस प्रमाणपत्र योजनेअंतर्गत सुमारे ८० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com