महिला दिनानिमित्त ‘ महिला आरोग्य आणि पोषण ‘ या विषयावर चर्चासत्र

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Seminar on ‘Women’s Health and Nutrition’ on the occasion of Women’s Day

महिला दिनानिमित्त ‘ महिला आरोग्य आणि पोषण ‘ या विषयावर चर्चासत्र

Savitribai Phule Pune Universityपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिशन (पुणे शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘ महिला आरोग्य आणि पोषण ‘ या विषयावर एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन केले आहे.

विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात हे चर्चासत्र होणार असून यासाठी नोंदणी आवश्यक आहे.

या चर्चासत्रात विद्यापीठातील आरोग्यशास्त्र प्रशालेतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंजेलिन जेयकुमार, वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.हेमलता कोटकर, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ.शिल्पी शर्मा आणि डॉ.राजेंद्र पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती चर्चासत्राच्या समन्वयक डॉ.सुरेखा सातपुते व इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिशन (पुणे शाखा) च्या निमंत्रक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.करिश्मा परदेसी यांनी दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *