Auto industry should invest more in research and development
मोटार उद्योगानं संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी
– पियुष गोयल
नवी दिल्ली : देशाच्या स्वदेशी धोरणाला हातभार लावण्यासाठी मोटार उद्योगाने संशोधन आणि विकास यासाठी अधिक वेळ, प्रयत्न आणि निधी यांची गुंतवणूक करावी अस आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली इथं ACMA च्या आत्मनिर्भर एक्सलन्स पारितोषिक आणि तंत्रज्ञान परिषद २०२३ ला संबोधित करत होते.
त्यांनी नमूद केले की भारताने अमृतकालमध्ये प्रवेश केला आहे आणि शाश्वततेसह महत्त्वपूर्ण क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे. ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था आणि व्यवसायांची वाढ तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकासातील गुंतवणुकीच्या पातळीवर अवलंबून असेल.
देश म्हणून भारताने उत्पादन आणि दर्जा याचं दुहेरी आव्हान स्वीकारायला हवं. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कुशल कर्मचारी आणि जबाबदारीची जाणीव यातूनच अशी आव्हाने आपण पेलू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
श्री गोयल पुढे म्हणाले की या दोन पैलूंवर लक्ष केंद्रित केल्याने, भारत किंमत स्पर्धात्मकतेमध्ये देखील उत्कृष्ट होईल आणि भारत आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होईल.
मंत्र्यांनी वाहन उद्योगाला स्थानिक खरेदी करण्याचे आवाहन केले आणि संपूर्ण मूल्य शृंखला स्वदेशी करण्यासाठी लहान पुरवठादारांना पाठिंबा देण्यास आणि सक्षम करण्यास सांगितले. डुप्लिकेट घटकांचा जागतिक बाजारपेठेतील भारताच्या विश्वासार्हतेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी ऑटो कॉम्पोनंट उद्योगाला या क्षेत्रातील अनौपचारिक भागाला औपचारिक करण्यावर भर देण्यास सांगितले.
कॉपीराइट आणि पेटंटच्या उल्लंघनाविरोधात उद्योगांनी आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री गोयल यांनी उद्योगांना त्यांच्या ग्राहकांना उत्पादनांची गुणवत्ता, आजीवन खर्च आणि कमी-गुणवत्तेच्या उत्पादनांशी संबंधित जोखमींबद्दल शिक्षित करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्यास सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com