ई-संजीवनी उपक्रमाद्वारे 80 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा.

eSanjeevani, Government of India’s National Telemedicine Service हडपसर मराठी बातम्या Hadapsar News, Hadapsar Latest News.

केंद्र सरकारच्या ई-संजीवनी उपक्रमाद्वारे 80 लाखांहून  अधिक रुग्णांना सेवा पुरवण्यात आली.

भारत सरकारची  ई संजीवनी ही  राष्ट्रीय टेलिमेडिसिन  सेवा  लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. 80 लाख दूरध्वनी-सल्ला मसलती  पूर्ण करून त्याने आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. सध्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा 35 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि दररोज देशभरातील 60 हजारांहून अधिक रूग्ण राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शासकीय आरोग्य सेवा यंत्रणेकडून आरोग्य सेवा मिळवण्यासाठी याचा  वापर करत  आहेत. E-Sanjeevani

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेली नॅशनल टेलीमेडिसिन सेवा दोन टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मद्वारे दोन प्रकारची टेलि-मेडिसिन सेवा प्रदान करत आहे. ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी (डॉक्टर-डॉक्टर टेलिकन्सलटेशनसाठी) हब आणि स्पोक मॉडेलवर आधारित आहे आणि ईसंजीवनीओपीडी (रूग्ण – डॉक्टर टेलिकन्सलटेशन) नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये  बाह्यरुग्ण सेवा प्रदान करते.

नोव्हेंबर 2019 मध्ये, केंद्र  सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत  ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.  डिसेंबर  2022 पर्यंत देशातील 1,55,000 आरोग्य व कल्याण केंद्रांवर ती कार्यरत होईल. त्याची अंमलबजावणी झाल्यापासून, ई-संजीवनीएबी-एचडब्ल्यूसी सुमारे 25000 आरोग्य व कल्याण केंद्रावर  कार्यरत आहे आणि  वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह सुमारे 2000 केंद्रांवर  ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीने सुमारे 39 लाख कन्सलटेशन पूर्ण केल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर, एप्रिल 2020 मध्ये पहिल्या राष्ट्रीय लॉकडाउन दरम्यान ई-संजीवनीओपीडी सुरू करण्यात आले. ई-संजीवनीओपीडी वर स्थापन केलेल्या 430 हून अधिक ऑनलाइनओपीडीच्या माध्यमातून नागरिकांना थेट घरगुती डिजिटल आरोग्य सेवा दिली जाते. यापैकी सुमारे 400 ऑनलाईन ओपीडी तज्ञ ओपीडी आहेत तर उर्वरित सामान्य ओपीडी आहेत. आतापर्यंत सुमारे 2 लाख रूग्णांनी ईसंजीवनीओपीडीच्या माध्यमातून सेवा दिली आहे.

अल्पावधीत भारत सरकारच्या नॅशनल टेलिमेडिसिन सर्व्हिसने शहरी आणि ग्रामीण भारतात अस्तित्त्वात असलेल्या डिजिटल हेल्थ डिव्हिजनची संयुक्तपणे भारतीय आरोग्य सेवा वितरण प्रणालीला मदत करण्यास सुरवात केली आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुषंगाने ईसंजीवनी देशातील डिजिटल हेल्थ इकोसिस्टमलाच चालना देत नाही तर दुय्यम व तृतीयक स्तरावरील रुग्णालयांवरील ओझे कमी करण्यासाठी डॉक्टर आणि तज्ञांच्या कमतरतेकडेही लक्ष देत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *