Increase in the salary of Asha and Anganwadi Sevaka, Kotwals
आशा आणि अंगणवाडी सेविका, कोतवालांच्या मानधनात वाढ
मुंबई : राज्यातल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या अंतर्गत पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. या मुलीचं वय १८ झाल्यावर तिला ७५ हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली.
कोतवालांना १५ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा त्यांनी आज केली. आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली काम करणाऱ्या महिलांसाठी ५० वसतीगृह आणि पीडीत महिलांसाठी ५० शक्तीसदन सुरू करणार, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत ४ कोटी महिलांची तपासणी करणार, तसंच अल्पसंख्याक समुदायातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २५ हजारावरुन ५० हजार रुपये केल्याची घोषणा फडनवीस यांनी केली.
२५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या महिलांना व्यवसाय करातून माफी देण्याची घोषणा फडणवीस यांनी आज केली. यापूर्वी ही मर्यादा १० हजार रुपये होती.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com