अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांसाठी निधी कुठून आणणार

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Where will the funds for the announcements announced in the budget come from?

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांसाठी निधी कुठून आणणार, असा विरोधकांचा सवाल

अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा अभाव आहे आणि वास्तवाचं भान नाही – विरोधी पक्षनेते अजित पवार

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

मुंबई : अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा अभाव आहे आणि वास्तवाचं भान नाही अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांसाठी निधी कुठून आणणार हा प्रश्न हा अर्थसंकल्प ऐकताना सातत्यानं पडत होता, असं ते म्हणाले.

राज्याचं आर्थिक उत्पन्न विचारात घेता जाहीर झालेल्या घोषणांची प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी आहे अशी टिप्पणी पवार यांनी केली. हा अर्थसंकल्प अर्थहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचे म्हटले. निवडणुका डोळयासमोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभेसोबत त्यांना विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, असेही पवार यांनी म्हटले.

राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील बहुतांशी मोठ्या महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतीच्या मुदत संपल्या आहेत. या ठिकाणी प्रशासकाच्या मार्फत कारभार सुरू आहे. येत्या काही महिन्यात या ठिकाणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातल्या गरीब, कष्टकरी, कामगार, श्रमिक यांच्या घामाला, श्रमाला, दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प असल्याचं भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *