Ministry of Health alerted about the spread of the H3N2 virus
H3N2 या विषाणूच्या प्रसाराबाबत आरोग्य मंत्रालय सतर्क
ताप आणि अंगदुखीच्या बाबतीत पॅरासिटामॉल
ओसेल्टामिवीर हे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले औषध आहे आणि ते सार्वजनिक आरोग्य प्रणालीद्वारे मोफत उपलब्ध
नवी दिल्ली : विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत सध्या पसरत असेलेल्या हंगामी फ्लू संदर्भात केद्रिय आरेग्य मंत्रालय सातत्यानं एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत लक्ष ठेऊन असल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्रलयानं जारी केलेल्या निवेदनांत स्पष्ट केलं.
राज्यांमधील हंगामी इन्फ्लूएंझा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, NITI आयोग आज, 11 मार्च रोजी एक आंतर-मंत्रालयीन बैठक घेणार आहे. सार्वजनिक आरोग्य उपायांच्या बाबतीत आणि वाढत्या हंगामी इन्फ्लूएंझा प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी या बैठकीत त्यांना आणखी समर्थन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल.
एका निवेदनात, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ते हंगामी इन्फ्लूएन्झाच्या H3N2 उपप्रकारामुळे होणारे रोग आणि मृत्यूचे प्रमाण देखील ट्रॅक करत आहे आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत कर्नाटक आणि हरियाणामध्येH3N2 इन्फ्लूएंझामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. सहव्याधी असलेली लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना या फ्लूची जोखीम आहे.
जगभरांत या विषाणूमुळे रुग्णांना श्वसनासंदर्भातील आजार होत आहे. गेल्या काही महिन्यात जगभरांत रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात दरवर्षी हंगामी इन्फ्लूएंझा साथ दोनदा येण्याची शक्यात असते. जानेवारी ते मार्च आणि मान्सूननंतरच्या हंगामात या प्रकारच्या संसर्गाचा प्रसार होतो. इन्फ्लूएंझामुळे उद्भवलेल्या संसर्गामध्ये मार्चच्या शेवटी घट होण्याची अपेक्षा आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक सल्लाही जारी केला आहे. त्यात लोकांना साबणाने आणि पाण्याने हात धुण्याची सूचना देण्यात आली आहे आणि लक्षणे असलेल्या रुग्णांना मास्क घालण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक झाकून ठेवावे आणि त्यांच्या डोळ्यांना आणि नाकाला स्पर्श करणे टाळावे. अशा रुग्णांना भरपूर द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि ताप आणि अंगदुखीच्या बाबतीत ते पॅरासिटामॉल घेऊ शकतात. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक आणि इतर औषधे घेऊ नयेत.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ओसेल्टामिवीर हे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले औषध आहे आणि ते सार्वजनिक आरोग्य प्रणालीद्वारे मोफत उपलब्ध करून दिले जाते. मंत्रालयाने सांगितले की राज्यांकडे पुरेशी रसद उपलब्ध आहे. तथापि, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, केंद्र राज्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com