मध्य रेल्वेच्या ब्रॉड गेज मार्गावर १०० टक्के विद्युतीकरण

Railway रेल्वे हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

100 per cent electrification of the broad gauge line of the Central Railway

मध्य रेल्वेच्या ब्रॉड गेज मार्गावर १०० टक्के विद्युतीकरण

मध्य रेल्वेच्या ३ हजार ८२५ किलोमीटर लांबीच्या ब्रॉड गेज मार्गावर १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या संपूर्ण चमुचं अभिनंदन केलंIndian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

मुंबई : मध्य रेल्वेनं आपल्या ३ हजार ८२५ किलोमीटर लांबीच्या ब्रॉड गेज मार्गावर १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केलं आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे ५ लाख २० हजार टन इतक्या मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा असून इंधनात होणाऱ्या कपातीमुळे १ हजार ६७० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

विद्युतीकरण प्रक्रियेत मध्य रेल्वेच्या केवळ सोलापूर विभागातल्या औसा रोड ते लातूर रोड या टप्प्यावरच्या ५२ किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण करणं शिल्लक होतं, ते देखील फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाल्याचं मध्य रेल्वेच्या मुख्यालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून मध्य रेल्वेच्या संपूर्ण चमुचं अभिनंदन

मध्य रेल्वेने संपूर्ण ब्रॉडगेज मार्गाचं 100% विद्युतीकरण साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या संपूर्ण चमुचं अभिनंदन केलं आहे.

मध्य रेल्वेच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी  ट्विट केले ; “अप्रतिम कामगिरी. संपूर्ण चमुचं अभिनंदन.”

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *