‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

The award was accepted by the author of the novel, Praveen Bandekar. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News,Hadapsar News

For Marathi ‘Ujvya Sondeche Bahulya’ the novel was awarded the Sahitya Akademi Award

मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदानThe award was accepted by the author of the novel, Praveen Bandekar.
हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला.
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News,Hadapsar News

नवी दिल्ली : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला.

येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के.श्रीनिवास राव यांच्यासह 24 भाषेतील पुरस्कारार्थी साहित्यीक व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्याच्या बाहुल्या’ या प्रायोगिक कादंबरीला वर्ष 2022 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी भाषेतील ‘ अमृतवेळ ‘ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.

प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी विषयी

उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृती वरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण यात केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय असलेल्या चित्रकथी सारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधून मधून कोकणी आणि गोव्यातील बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलीजीयाचे चित्रणअतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे. ‘

प्रवीण बांदेकर यांच्या विषयी

मराठीतील सुप्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर कवी समीक्षक आहेत त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झालेला आहे त्यांनी इंग्रजी व मराठी साहित्यात यांनी केले आहे ते सावंतवाडी येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्वी त्यांच्या येरू म्हणे, चाळेगत, ,इंडियन ॲनिमल फार्म, चिनभिन असे साहित्य प्रकाशित झालेले आहे. श्री बांदेकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, जैन फाउंडेशनचा ना.धों महानोर पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *