राज्यात H3N2 संसर्गामुळे दोन मृत्यू

Two deaths due to H3N2 infection in the state राज्यात H3N2 संसर्गामुळे दोन मृत्यू हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Two deaths due to H3N2 infection in the state

राज्यात H3N2 संसर्गामुळे दोन मृत्यू

H3N2 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाचा आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशाराTwo deaths due to H3N2 infection in the state
राज्यात H3N2 संसर्गामुळे दोन मृत्यू
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : राज्यात H3N2 विषाणूची लागण होऊन दोन मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर इथं एका जेष्ठ नागरिकाचा H3N2 ने मृत्यू झाला होता त्यानंतर काल अहमदनगर इथल्या एका वैद्यकिय विद्यार्थ्याचा H3N2 ने मृत्यू झाला.

राज्यात H3N2 ने मृत्यू पावलेले दोन्ही रुग्ण इतर आजारांनीही बाधित होते असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगीतलं. सध्या राज्यात साडेतीनशे रुग्णांच्या H3N2 विषाणू चाचण्या सकारात्मक आल्याचं त्यांनी नमूद केलं.

सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या – विरोधी पक्ष नेते अजित पवार

एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणी करता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचं ते म्हणाले.

संपाबाबतही सरकारनं तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अहमदनगर आणि नागपूरमधे या आजारानं दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका रुग्णालयात दीडशेहून जास्त शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *