स्मार्ट शहरांमध्ये चांगली देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण केंद्रे कार्यान्वित

Ministry of Road Transport and Highways of India Ministry of Road Transport and Highways of India रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Control centres are operationalized for better monitoring in smart cities

स्मार्ट शहरांमध्ये चांगली देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण केंद्रे कार्यान्वित

देशातील सर्व 100 स्मार्ट शहरांमध्ये चांगली देखरेख ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्रे कार्यान्वित

नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी निर्णय समर्थन प्रणाली

उत्तम देखरेख आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका

Ministry of Road Transport and Highways of India Ministry of Road Transport and Highways of India 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्‍ली : भारत सरकारने 25 जून 2015 रोजी स्मार्ट सिटी मिशन (SCM) सुरु केले. जानेवारी 2016 ते जून 2018 या कालावधीत 4 स्पर्धात्मक फेऱ्यांमधून 100 स्मार्ट शहरांची निवड करण्यात आली.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत, सर्व 100 स्मार्ट शहरांमध्ये आयसीसीसी (इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंट्रोल सेंटर), अर्थात एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ही केंद्रे शहरांचे जणू मेंदू आणि मज्जा संस्थासारखे काम करतील अशी संकल्पना करण्यात आली असून, यामध्ये नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी निर्णय समर्थन प्रणाली आहे. ही आयसीसीसी, वाहतूक व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी वितरण व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्ये उत्तम देखरेख आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत.

आयसीसीसी, अद्ययावत डेटा, केंद्रीकृत निरीक्षण आणि माहितीपूर्ण निर्णयाचा वापर करून शहरांना अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी मदत करतात, जे शहरांना समावेश, कार्यक्षमता आणि नवोन्मेषाच्या दिशेने घेऊन जातात.

100 आयसीसीसी पैकी 30 केंद्रांमध्‍ये वाहतूक व्यवस्थापन आणि अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम (ATCS), अर्थात अनुकूल वाहतूक नियंत्रण प्रणाली, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS), अर्थात एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, रेड लाईट व्हायलेशन डिटेक्शन (RLVD), अर्थात वाहतूक नियंत्रणासाठी लावण्‍यात आलेला लाल दिवा ओलांडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचा शोध, नंबर प्लेटवरून, स्वयंचलित पद्धतीने घेण्‍याचे काम केले जाते.

स्थानिक प्रतिभा/स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने 15 एप्रिल 2021 रोजी ट्रान्सपोर्ट 4 ऑल चॅलेंज (T4All) ची सुरुवात केली. सर्व नागरिकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा करणारे उपाय विकसित करण्यासाठी शहरे, नागरिक गट आणि स्टार्टअप्सना एकत्र आणणे हे चॅलेंजचे उद्दिष्ट आहे.

तथापि, रहदारीचे उल्लंघन/चलान (पावत्या) आणि ई-चलान इ.ची नोंद स्मार्ट सिटीज मिशनच्या जिओस्पेशिअल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम (GMIS), अर्थात भू-स्थानिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे ठेवली जाते.

देशाच्या विविध राज्यांमधील ITMS द्वारे प्राप्त शहर/स्थाननिहाय आणि वर्षनिहाय चलानची (पावत्या) आकडेवारी परिशिष्ट – A मध्ये तपशीलवार देण्यात आली आहे.

2021 मध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंघुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधून रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कापण्यात आलेल्या चलान द्वारे महसूल जमा करण्यात आला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *