स्वच्छता मोहिमेत 12.01 लाख चौरस फूट जागा आणि  ₹62.54 कोटी  महसूल

Swacha-Bharat-Abhiyan स्वच्छ भारत मिशन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

12.01 lakh square feet of vacant space and revenue of Rs 62.54 crore in a cleanliness drive

स्वच्छता मोहिमेत 12.01 लाख चौरस फूट जागा रिकामी आणि  ₹ 62.54 कोटी  महसूल

2 ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यानच्या स्वच्छता मोहिमेत 6154 कार्यालयांतील 12.01 लाख चौरस फूट जागा रिकामी, भंगारातून 62.54 कोटी ₹ चा महसूल जमा

Swacha-Bharat-Abhiyan स्वच्छ भारत मिशन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
स्वच्छ भारत मिशन

नवी दिल्‍ली : केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये त्यांच्या संलग्न/अधिनस्थ कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी केंद्र सरकारने 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. या मोहिमेत केंद्र सरकारच्या 6154 हून अधिक कार्यालयांनी भाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या 6154 कार्यालयांमधील सुमारे 12.01 लाख चौरस फूट जागा रिकामी करून स्वच्छ करण्यात आली. महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान भंगार सामानाची विल्हेवाट लावून 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

ही जागा संबंधित कार्यालयांनी अंगण, उपाहार गृह, ग्रंथालये, परिषद, बैठकांसाठी सभागृह, निरामय केंद्रे आणि गाडीतळ अशा विविध कारणांसाठी वापरामध्‍ये आणली आहे, अशी माहिती मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *