India beat Australia by 5 wickets in the first ODI
भारताची ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने मात
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने मात
राहुल-जडेजाच्या खेळीमुळे भारतीय संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय
मुंबई: भारत आणि आस्ट्रेलियामध्ये (Ind vs Aus ODI) सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय प्राप्त केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे
भारताच्या ऑस्ट्रेलिया विरोधातल्या एकदिवसीय मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी १८९ असे माफक आव्हान दिलं होत.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दीक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळत असून त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणं निवडलं. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एक एक करत बाद झाले आणि त्यांचा डाव केवळ १८८ धावांमध्ये आटोपला.
पाहुण्यांसाठी मिचेल मार्शने ८१ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
१८९ धावांचं आव्हानं घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातही डळमळीत झाली. भारताचे पहिले ३ फलंदाज हे स्वस्तात बाद झाले. ३९ वर ४ बाद अशी स्थिती असताना केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने छोटी पण महत्त्वाची भागीदारी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांड्या २५ धावांवर बाद झाला आणि भारतीय संघ ८३वर ५ बाद अशी झाली. त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीमुळे भारताला विजयला गवसणी घातली.
राहुल आणि रवींद्र जडेजाने सयंमी खेळी करत ६व्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. यावेळी राहुलने ७५ धावांची नाबाद खेळी करत १३वे अर्धशतक साजरे केले. तसेच, जडेजानेही ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. केएल राहुलच्या ७५ धावांच्या जोरावर यजमानांनी ३९.५ षटकांतच लक्ष्य गाठले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com