प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार

Assembly proceedings विधानसभा कामकाज हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या हडपसर न्युज Hadapsar Crime News Hadapsar Marathi News Hadapsar News

A medical college will be started in every district

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार

– वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

सुपर स्पेशलिटी रुग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना अधिक गती देण्यात येणार

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले. Medical Education Minister Girish Mahajan वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागावर चर्चा झाली.

यावर ग्राम विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तरे दिली.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सुपर स्पेशलिटी रुग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात अधिक गती देण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत या अर्थसंकल्पात केलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली व मंत्री श्री.चव्हाण यांनी अन्न व नागरी ग्राहक संरक्षण विभागाकडून या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *