पीएफआयच्या १९ सदस्यांच्या विरोधात पाचवं आरोपपत्र दाखल

National Investigation Agency

NIA files 5th chargesheet against the 19 members of PFI

पॉप्युलरफ्रंट ऑफ इंडियाच्या १९ सदस्यांच्या विरोधात पाचवं आरोपपत्र दाखल

प्रतिबंधित संघटना पॉप्युलरफ्रंट ऑफ इंडियाच्या १९ सदस्यांच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेचं पाचवं आरोपपत्र दाखलNational Investigation Agency

नवी दिल्ली : प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) १९ सदस्यांच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA)पाचवे आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीतल्या १२ सदस्यांचा समावेश आहे.

या सदस्यांवर देशात इस्लामिक न्याय व्यवस्था स्थापित करण्यासाठी जिहाद सुरु करण्याचे षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दिल्ली प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर, एनआयएने देशभरातील पीएफआय या संघटनेच्या संदर्भातल्या विविध प्रकरणात आजवर १०५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रवक्त्यानं दिली.

भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या १९ आरोपींमध्ये सलाम, रहिमन, नजरुद्दीन, अहमद, अफसर पाशा, ई अबुबकर, प्रो पी कोया आणि मोहम्मद अली जिना यांचा समावेश आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. गृह मंत्रालयाने या गटावर बंदी घातल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशभरातील पीएफआय कार्यालयांसह ३९ ठिकाणी देशव्यापी कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली होती.

गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरु असून पीएफआय देशाला धर्माच्या आधारावर विभाजित करण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचं या तपासात समोर आलं आहे.

या प्रकरणामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ने देशाला सांप्रदायिक रेषेत विभाजित करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचे उघड झाले आहे. भारतातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासन व्यवस्था उलथून टाकून त्या जागी इस्लामिक खिलाफत आणणे हा कटाचा अंतिम उद्देश होता, असेही राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *