Due to multi-state cooperative societies, the farmers will be financially saved in the future
बहुराज्यीय सहकारी संस्थांमुळे आगामी काळात शेतकऱ्यांचा आर्थिक उद्धार होईल – अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातच्या जुनागढ मध्ये कृषी शिबीरात जिल्हा बँक मुख्यालयांची कोनशिला बसवली आणि एपीएमसी किसान भवनाचे उद्घाटन केलं
जुनागढ : सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला पुढे नेण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. आता लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून त्याचा लाभ घेत आहेत असं ते म्हणाले. नैसर्गिक शेती केल्याने उत्पादन वाढतं, पावसाच्या पाण्याचा संचय होतो, कीटकनाशकांच्या वापराला आळा बसतो आणि उत्पादनातही वाढ झाल्याने बाजारात चांगला भाव मिळतो, असं ते म्हणाले.
नैसर्गिक शेतीला अनन्यसाधारण महत्व असून ते कृषी क्षेत्राचं भविष्य आहे, असं ते म्हणाले. शेतात नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या उत्पादनांना अमूल हा ब्रँड दिला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, येत्या पाच वर्षात ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये लागू करण्याचा विचार आहे, असं शाह यांनी सांगितलं. मजबूत सहकारी पायाभूत यंत्रणा हाच देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा एकमेव मार्ग असल्याचं ते म्हणाले
सेंद्रिय उत्पादनांचा प्रसार आणि शेतमालाच्या निर्यातीसाठी तयार केलेल्या बहुराज्यीय सहकारी संस्थांमुळे आगामी काळात शेतकऱ्यांचा आर्थिक उद्धार होईल, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरात मध्ये जुनागढ इथं नवीन ए पी एस सी किसान भवनाचं उदघाटन आणि जिल्हा बँकेच्या मुख्यालयाची पायाभरणी आज अमित शाह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com