राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Congress leader Rahul Gandhi काॅग्रेस नेते राहुल गांधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar

Rahul Gandhi sentenced to 2 years in jail in defamation case

राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती

Congress leader Rahul Gandhi काॅग्रेस नेते राहुल गांधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar
File Photo

सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरुन केलेल्या टिप्प्णीसाठी सुरतच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं असून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायालयाने शिक्षेचे प्रमाण म्हणून 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही जाहीर केली. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्यासाठी ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली.

या आदेशामुळे राहुल गांधी यांचे खासदार म्हणून सदस्यत्व गमवावे लागू शकते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ शकते. प्रशासनाने सूरतच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत लोकसभा सचिवालयात पाठविली आणि लोकसभा सभापतींनी ती प्रत स्वीकारी, तर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व संपू शकते. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शखते. अशाप्रकारे राहुल गांधी एकूण आठ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत.

निकाल सुनावण्यात आला तेव्हा राहुल गांधी न्यायालयात हजर होते. यावेळी त्यांनी ”मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही”, असे न्यायालयाला सांगितलं.

सर्वच चोरांच्या आडनावात मोदी कसं काय असतं, अशी टिप्पणी २०१९ मधे केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्याने हे भाष्य केले. भाजपाचे गुजरातमधले आमदार पूर्णेश मोदी यांनी गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

त्यावर सुरत न्यायालयाने आज हा आदेश दिला. गांधी यांना वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी ३० दिवसांचा जामीन न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जेव्हाही राहुल गांधी काही बोलतात तेव्हा ते देश आणि त्यांच्या पक्षाला लाजिरवाणे निमंत्रण देतात.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *