शेतकरी समृद्ध व्हावा याकरता राज्यशासन सतत प्रयत्नशील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The state government is constantly striving to make the farmers prosperous

शेतकरी समृद्ध व्हावा याकरता राज्यशासन सतत प्रयत्नशील

शेतकरी समृद्ध व्हावा याकरता राज्यशासन सतत प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन'Mahapushudhan Expo' महापशुधन एक्स्पो हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

शिर्डी : शेतकरी समृद्ध व्हावा याकरता राज्यशासन सतत प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं आयोजित महापशुधन एक्सपोच्या समारोप समारंभात आज ते बोलत होते. पशुधन विकासाचा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी समृद्धी घेऊन येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. यासाठी ‘महापशुधन एक्स्पो’ आयोजित करण्यात आला होते.

केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेबरोबरच राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अधिकचं अर्थसहाय्य आपल्या सरकारने दिलं असून दुष्काळी भागात आणखीही मदत दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं शिंदे म्हणाले.

शिर्डी इथल्या प्रस्तावित थीम पार्कसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. गेल्या शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या एक्सपोचं उद्घाटन झालं होतं. मेळाव्याला सात ते आठ लाख शेतकऱ्यांनी भेट दिल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. 100 पेक्षा जास्त प्रजातींच्या पशुधनाने या प्रदर्शनात भाग घेतला.

adapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *