समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्यापक व्हावा

Publication of the book "Olakh Dasbodhachi". "ओळख दासबोधाची" पुस्तकाचे प्रकाशन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The spread and propagation of Samarth Ramdas’s thoughts should be widespread

समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्यापक व्हावा

– योगेशबुवा रामदासी

“ओळख दासबोधाची” पुस्तकाचे प्रकाशन

पुस्तकामुळे समर्थांच्या विचाराच्या प्रसाराला अधिक गती मिळणारPublication of the book "Olakh Dasbodhachi".
"ओळख दासबोधाची" पुस्तकाचे प्रकाशन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे: “ओळख दासबोधाची” हे पुस्तक म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रसाद आहे आणि या विचारांचा प्रसार आणि प्रचार अधिक व्यापक झाला पाहिजे, अशी अपेक्षा सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी व्यक्त केली.

चैतन्य ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सज्जनगड येथे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक सुहास कुलकर्णी, दासबोध अध्ययन केंद्राचे संचालक सुहास क्षीरसागर, चैतन्य ज्ञानपीठाचे राष्ट्रीय समन्वयक मुकुंदराव गोरे, चैतन्य साधना मासिकाचे संपादक गिरीशंत उमरखेडी, एकवीरा प्रकाशनचे भालचंद्र कुलकर्णी, हिंदूबोध मासिकाचे संपादक रवीकांत कळंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.

योगेशबुवा पुढे म्हणाले की, लेखक सुहास कुलकर्णी यांनी दासबोधाची ओळख समाजाला व्हावी या हेतूने या पुस्तकाचे लेखन केले आहे. पुस्तकाची भाषा सहज सोपी आणि अभ्यासकांना समजण्यास उपयुक्त आहे. समाजाच्या भौतिक आणि अध्यात्मिक प्रगतीला यामुळे हातभार लागणार आहे.

समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला बरेच काही दिले आहे. त्यामधून समाजाविषयी तळमळ दिसून येते. या पुस्तकामुळे समर्थांच्या विचाराच्या प्रसाराला अधिक गती मिळणार आहे. सध्याच्या काळाची गरज ओळखून समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. दासबोधातील 200 समासांचे 20 दशकाद्वारे दासबोधाची ओळख सहजपणे या पुस्तकातून करुन देण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना गोरे म्हणाले की, समाजातील विविध घटकापर्यंत हे पुस्तक जाणे आवश्यक आहे, कारण यानिमित्ताने समर्थाच्या विचारांचा प्रसार होण्यास हातभार लागणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात, गावागावात हे पुस्तक उपलब्ध झाले पाहिजे.

यावेळी लेखक कुलकर्णी म्हणाले की, गेली अनेक वर्षे दासबोधाचा अभ्यास करतो आहे. यावर स्वतंत्रपणे लेखन करावे असा विचार केला आणि हिंदूबोध मासिकामध्ये लेखमाला सुरू केली. या लेखनाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळेच लेखमालेचे रूपांतर पुस्तकामध्ये होऊ शकले आहे. या पुस्तकासाठी पृष्ठदानाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे, तो सर्व निधी चैतन्य ज्ञानपीठाच्या भावी योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.

गिरीशंत उमरखेडी यांनी सूत्रसंचालन केले तर चैतन्य ज्ञानपीठाचे विश्‍वस्त हरी सोवनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *