रस्त्यावरील बालकांसाठी पथदर्शी फिरते पथक स्थापन होणार

Women & Child Development

Pathdarshi mobile team will be formed for street children

रस्त्यावरील बालकांसाठी पथदर्शी फिरते पथक स्थापन होणार

पुणे : रस्त्यावरील बालकांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ‘पथदर्शी फिरते पथक’ या प्रकल्पास केंद्र शासनाने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत

Women & Child Development
Women and Child Development

. पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

पथदर्शी फिरते पथक हा प्रकल्प पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, मुंबई शहर व नागपूर या ६ जिल्ह्यामध्ये ६ महिन्याकरीता प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहेत.

प्रकल्पास केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून भागविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी २५ आसनी बस/व्हॅन साठी एक समुपदेशक, शिक्षिका/शिक्षक, वाहनचालक, काळजीवाहक अशा ४ कर्मचाऱ्यांची एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही बस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा गर्दीच्या ठिकाणी फिरेल.

पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी इच्छूक स्वयंसेवी संस्थांनी ७ दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गुलमर्ग पार्क, को-ऑप. हौ. सोसायटी, जाधव बेकरी जवळ, २९/२, सोमवार पेठ, पुणे – ४११०११ येथे संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत, असेही कळविण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *