कृषी निर्यातीत चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय Union Ministry of Agriculture and Farmers Welfare हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Six per cent increase in agricultural exports in the current financial year compared to last year

कृषी निर्यातीत चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के वाढ

निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी  फार्मर कनेक्ट पोर्टलकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय Union Ministry of Agriculture and Farmers Welfare हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : कृषी निर्यातीत एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कृषी निर्यात ४३ अब्ज डॉलर पेक्षा अधिक झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

कृषी क्ष्रेत्रातल्या निर्यातीत वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या मिळकतीवर होईल, असंही पटेल यावेळी म्हणाल्या. शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी, सरकारने शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (एफपीओ/एफपीसी) आणि सहकारी संस्थांना निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याकरिता फार्मर कनेक्ट पोर्टल सुरू केले आहे.

कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाने राज्य आणि जिल्हा स्तरावर अनेक पावले उचलली आहेत. राज्य विशिष्ट कृती आराखडा तयार करण्यात आला आहे आणि अनेक राज्यांमध्ये राज्यस्तरीय देखरेख समित्या (एसएलएमसी), कृषी निर्यातीसाठी नोडल एजन्सी आणि क्लस्टर स्तर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी निर्यात धोरण (एईपी) ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार जिल्ह्याचा निर्यात केंद्र (डीईएच) उपक्रम म्हणून वापर करत आहे.

कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) हे कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात प्रोत्साहन उपक्रमांमध्ये निरंतर व्यग्र आहे आणि त्यांने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अपेडा ही ‘कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात प्रोत्साहन योजना’ लागू करते. विविध विकासात्मक उपक्रम हाती घेतले जातात आणि निर्यातदारांना योजनेच्या विविध घटकांतर्गत सहाय्य प्रदान केले जाते उदा. पायाभूत सुविधांचा विकास, बाजारपेठ विकास आणि गुणवत्ता वर्धन.

शेतकरी गटांना निर्यात बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि उद्योजकांना संभाव्य निर्यातदार बनण्यास मदत करण्यासाठी अपेडा कृषी-निर्यात क्लस्टर्समध्ये आणि राज्यांमध्ये शेतकरी, शेतकरी-उत्पादक संस्था (एफपीओ) आणि निर्यातदार यांच्यासाठी राज्य विभाग, राज्य कृषी विद्यापीठे आणि कृषी विकास केंद्रांच्या सहकार्याने क्षमता निर्माण/प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *