Sharad Pawar’s stance on the Adani Group case inquiry is different from other opponents
अदानी उद्योग समूह प्रकरणाच्या चौकशीबाबत शरद पवार यांची इतर विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका
अदानी उद्योगासमुहा प्रकरणाच्या शरद पवारांच्या भूमिकेचं रामदास आठवलेंकडून स्वागत
मुंबई : अदानी उद्योग समूहाला काही अज्ञात शक्तींकडून लक्ष्य बनवलं जात असून या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचा आपला आग्रह नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
एका खाजगी दूरचित्र वाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते. संसदेत भाजपा बहुमतात असताना संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी करण्यात काय अर्थ आहे, असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अदानी समूह यांच्यातल्या संबंधाविषयी अनेकांनी आतापर्यंत भाष्य केलं आहे. मात्र या मुद्याला अवाजवी महत्त्व देऊन संसदेचं कामकाज एवढे दिवस बंद पाडणं आपल्याला पटत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.खाजगी उद्योग समूह देशाच्या विकासात भरीव योगदान देत असतात त्यामुळे त्यांना लक्ष्य बनवणं उचित नाही असं सांगून अशी कामं करणाऱ्या संस्थांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली.
शरद पवारांच्या भूमिकेचं रामदास आठवलेंकडून स्वागत
अदानी उद्योगासमुहा प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची मागणी योग्य नाही या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचं केन्द्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केलं आहे. सर्व विरोधक संयुक्त संसदीय समितीची मागणी करत असताना पवार यांनी या भूमिकेला छेद देत ही मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. आठवले आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, अदानी उद्योग समूहा प्रकरणी संयुक्त संसदीय समिती मार्फतच चौकशी झाली पाहिजे या मागणीवर कॉंग्रेस ठाम असल्याचं, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांबरोबर बोलत होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अदानी उद्योग समूह प्रकरणाबाबत शरद पवार यांची वेगळी भूमिका”