We do not insist on a Joint Parliamentary Committee inquiry into the Adani case.
अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा आपला आग्रह नाही
मात्र विरोधकांची भूमिका एकच राहिल्यास आपणही पाठिंबा देऊ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
नाशिक: उद्योगपती अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा आपला आग्रह नाही मात्र विरोधकांची भूमिका एकच राहिल्यास आपणही पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.
नाशिक दौऱ्यादरम्यान ते आज वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याला सरकारचं प्राधान्य असलं पाहिजे मात्र राज्यसरकार त्यात अपयशी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली.
सध्या बेरोजगारी महागाई सारखे मोठे प्रश्न जनतेसमोर उभे आहेत. त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. परंतु ते सर्व सोडून आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
कर्नाटकाच्या निवडणुकी संदर्भात ते म्हणाले की, कर्नाटकामध्ये भाजपचा पराभव हा अटळ आहे. या ठिकाणी काँग्रेसच सत्तेवरती येईल असा दावा करून म्हणाले की, काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवारही निवडणूक रिंगणामध्ये असतील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com