देशभरात कोविड-१९ च्या ५ हजार ८८०, तर राज्यात ७८८ नव्या रूग्णांची नोंद

Covid-19-Pixabay-Image

5 thousand 880 cases of Covid-19 have been recorded across the country

देशभरात कोविड-१९ च्या ५ हजार ८८०, तर राज्यात ७८८ नव्या रूग्णांची नोंदCovid-19-Pixabay-Image

नवी दिल्ली : देशभरात काल कोविड-१९ च्या ५ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली. ३ हजार ४८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, देशात ३५ हजार १९९ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पुर्णांक ७३ शतांश टक्के आहे. राज्यात कोविड-१९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असून, उपचाराधीन रूग्णांची संख्या साडेचार हजाराच्या वर गेली आहे.

राज्यात काल ७८८ नव्या रूग्णांची नोंद झाली, ५६० रुग्ण बरे झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८१ लाख ४९ हजार, ९२९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७९ लाख ९६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४८ हजार ४५९ रुग्ण दगावले.

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.28 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 85,076 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मंत्रालयाने सांगितले की, देशभरात 220 कोटी 66 लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 205 लस मात्रा देण्यात आल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *