Navi Mumbai Municipal Commissioner’s directive to increase covid testing
कोविड चाचण्यात वाढ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
कोविड रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीप्रमाणे कोव्हीड वॉर रूम पुन्हा सुरू करण्याचे आदेश
मुंबई : कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्यानं कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोविड चाचण्यात वाढ करण्याचे निर्देश, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
महानगरपालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ इथल्या तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांच्या ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी एकूण पन्नास खाटांची सुविधा, कोविड रुग्णांवरील उपचार करण्यासाठी सध्या सुरू आहे.
याशिवाय सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी इथल्या अतिदक्षता विभाग सुविधेतील ७५ खाटा सर्व अत्यावश्यक सुविधांनी सज्ज असल्याची पडताळणी करून घ्यावी. तसंच आवश्यकता भासल्यास ते तत्परतेनं सुरू करण्याच्या दृष्टीनं सज्ज राहायला आयुक्तांनी सांगितलं.
तसंच कोविड रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीप्रमाणे कोव्हीड वॉर रूम पुन्हा सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेताना त्यांनी चाचणीची आकडेवारी आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहिली. त्यांनी नागरी संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक विभागाची विभागवार माहिती देखील तपासली.
चाचण्या वाढविण्याच्या सूचना देतानाच, शासनाच्या निर्देशानुसार ६० टक्के आरटीपीसीआर चाचण्या आणि ४० टक्के अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण राखण्याची काळजी घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. रुग्णालयांमध्ये चोवीस तास चाचणी सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत याची खात्री करा, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com