नवीन विदा सुरक्षा विधेयकाचा मसुदा संसदेच्या आगामी पावसाळी आधिवेशनात मांडण्यात येणार

Supreme Court of Indiaहडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

The new data protection bill will be tabled in the upcoming monsoon session of Parliament

नवीन विदा सुरक्षा विधेयकाचा मसुदा संसदेच्या आगामी पावसाळी आधिवेशनात मांडण्यात येणार

नवीन विदा सुरक्षा विधेयकाचा मसुदा संसदेच्या आगामी पावसाळी आधिवेशनात मांडण्यात येईल, असं केंद्रसरकारचं सर्वोच्च न्यायालयात निवेदनSupreme Court हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

नवी दिल्ली : नवीन विदा सुरक्षा विधेयकाचा (Data Protection Bill) मसुदा तयार असून संसदेच्या आगामी पावसाळी आधिवेशनात ते मांडण्यात येईल, असं केंद्रसरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. वैयक्तिक माहिती खाजगी ठेवण्याचा हक्क आणि त्या माहितीची सुरक्षितता (the right to keep personal information private and security of that information.) या संदर्भात पाच सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरु आहे.

पीठाचे प्रमुख न्यायमूर्ती के एम जोसेफ येत्या १६ जून रोजी सेवा निवृत्त होणार असून पुढची सुनावणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दुसऱ्या न्यायाधीशंची नेमणूक पीठावर करतील, असं आज न्यायालयानं सांगितलं.

न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, आणि न्यायमूर्ती सी टी रविकुमार हे पीठाचे इतर सदस्य आहेत.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी न्यायालयाच्या सुनावणीला विधिमंडळ प्रक्रियेशी जोडू नये, असे मत मांडले. ते म्हणाले की कायदेविषयक प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि ती पुन्हा काही समित्यांकडे पाठविली जाऊ शकते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *