पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त

Union Road Transport Highways Minister-Nitin Gadkari हडपसर मराठी बातम्या, Hadapsar Latest News, Hadapsar News

Maharashtra will be made railway gate free within the next five years

पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त-

-केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी

सीआरएफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल

नागपूर : पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल . केंद्रीय रस्ते निधी -सीआरएफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल.

Union Road Transport Highways Minister-Nitin Gadkari हडपसर मराठी बातम्या, Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

सध्या राज्यामध्ये 1 ,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केली .

महारेल या महाराष्ट्र शासन तसेच रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सुमारे 306 कोटी रुपयांच्या 6 उड्डाणपूलांचे (आरओबी )लोकार्पण तसेच 600 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज अजनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते संपन्न झाला . त्यावेळी ते बोलत होते .

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुरदृश्य प्रणालीव्दारे संबोधित केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस , रामटेकचे खासदार कृपाल तुमाने , महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

मंजूर केलेल्या 25 आरओबी मध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकावरील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज करण्यात आले . या संदर्भात माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की , अजनीचा हा पूल ब्रिटिशकालीन असून तो 1927 मध्ये बांधला गेला होता . या पूलावरील जड वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आता बंद केली असून महाराष्ट्र शासनाने महारेलच्या माध्यमातून येथे तीन लेन चा दुहेरी ब्रिज मंजूर केला असून याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे फुटपाथ देखील मंजूर केले आहेत .

या पुलावर होणाऱ्या एलईडी लाइट्सच्या सुशोभीकरणामुळे हा ब्रिज एक ‘आयकॉनिक ‘ ब्रिज ठरणार असून त्यांनी या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

अजनीच्या पुलाव्यतिरिक्त अमरावती – बडनेरा, अमरावती – निंभोरा, अमरावती -नरखेड या अमरावती जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड, यवतमाळ जिल्ह्यातील वणी – वरोरा ,मांजरी ते पिंपळखुटी सेक्शन अशा एकूण 5 आरओबीचे आज भूमिपूजन करण्यात आलं .

केंद्रीय रस्ते निधी मधूनच नागपूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे 500 कोटी रुपयांच्या तरतुदीची नवीन कामांची घोषणा सुद्धा गडकरी यांनी याप्रसंगी केली .

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की महारेल मुळे केवळ विदर्भातच नव्हे तर राज्यामध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधाच रूप बदलत आहे. जनतेच्या पैशाची तसेच इंधनाची बचत होण्यासाठी तसेच फाटक विरहित वाहतूक होण्यासाठी 100 आरोबीची उभारणीय महारेलद्वारे करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तसेच अजनी या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास रेल्वे मंत्रालयाद्वारे केला जात असून ही स्थानके जागतिक दर्जाची बनवले जात असल्याचा उल्लेख केला . नागपूरचे बसस्थानक -बसपोर्ट सुद्धा प्रवाशांच्या सुविधे करिता अत्याधुनिक सुविधांनी युक्त तयार करण्यासाठी महारेल काम करेल अशी घोषणा त्यांनी केली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *