Ajit Pawar reveals that he will stay in NCP
आपण राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवार यांचा खुलासा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत जातील या चर्चेवर स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत जाहीर खुलासा केला
सरकारला आलेल्या अपयशावरुन जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी आपल्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत जातील या चर्चेवर स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत जाहीर खुलासा केला.
माझ्या बाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविल्या जात असल्याचा अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मला आमदार कामानिमित्त भेटले दुसरा अर्थ नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा, त्याचा आता तुकडा पाडा असेही आवाहन अजित पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की यामध्ये कुठलेही तथ्य नाही. माझ्या भूमिकेवर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी बोलू नये. शिंदे गटाच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही.
सरकारला आलेल्या अपयशावरुन जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी आपल्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा
सरकारी कार्यक्रमात उष्माघाताने झालेले मृत्यू ते अवकाळी पावसाने केलेलं नुकसान, महागाई ते रखडलेली कांदा खरेदी इत्यादी गोष्टी हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरुन जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी आपल्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा केल्या जात आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं.
आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या अनुयायांची शिस्त वाखाणण्याजोगी असते पण कार्यक्रम बंदिस्त जागी घेता आला असता असं सांगत महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरणाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेला सरकार जबाबदार आहे असं पवार म्हणाले.
अवकाळी पाऊस झालेल्या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला पण नंतर ज्या तातडीनं मदत व्हायला हवी ती झालेली नाही. पंचाहत्तर हजारांच्या भरतीचा निर्णय झाला ती अजून झालेली नाही असा पाढा वाचत अजित पवारांनी कोणत्याही पत्रावर ४० किंवा कितीही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत आणि आपण सर्व राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
राज्यकर्त्यांचं अपयश लपवण्यासाठी आपल्याला जाणीपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे आपण उद्विग्न आहोत असंही ते म्हणाले. पत्रकारांना बातम्या हव्या असतात हे मान्य असलं तरी अशा प्रकारे वावड्या उठवणं चुकीचं आहे असं सांगत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमं तसंच छापिल माध्यमांनाही कानपिचक्या दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com