राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र

Vande Bharat 2 High-Speed ​​Train वंदे भारत 2 हाय-स्पीड ट्रेन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Prime Minister Narendra Modi asserted that the development of the states is the formula of the country’s development

राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

केरळातील तिरूअनंतपुरम ते कासारगोड दरम्यानच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवला हिरवा झेंडा

Prime Minister Narendra Modi
File Photo

तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला.

कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम -कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली.त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.

ही गाडी तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड,कन्नूर आणि कासरगोड या 11 जिल्ह्यांतून प्रवास करेल.

राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र आहे. आमचं सरकार जागतिक विकासाच्या दृष्टीनं प्रय़त्न करत असून, भारत विकासाच गतिशील केंद्र बनत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. ते आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम स्थानकातून पहिल्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर बोलत होते.

ते पुढं म्हणाले की, ४०० वंदे भारत ट्रेन देशभरात चालू करण्याचा मानस असून या रेल्वे पर्यावरणपूरक आहेत. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तिरुअनंतपुरम ते कासरगोड दरम्यान धावणारी ही गाडी 11 जिल्ह्यांमधून जाणार असून, सुमारे 588 किलोमीटरचं अंतर आठ तासांत पूर्ण करणार आहे. उद्यापासून कासारगोड स्थानकावरून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल.
केरळ मधल्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *