वाढत्या ई-वाणिज्य बाजारामध्ये स्थानिक भाषा आणि उत्पादने यांना मोठे प्रोत्साहन

Develop a plan to curb counterfeit text about goods and products on e-commerce websites ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट मजकूरांवर अंकुश ठेवण्यासाठी आराखडा विकसित करणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

A big boost for local languages and products in the growing e-commerce market

वाढत्या ई-वाणिज्य बाजारामध्ये स्थानिक भाषा आणि उत्पादने यांना मोठे प्रोत्साहन

देशातल्या वाढत्या ई-वाणिज्य बाजारपेठांमुळे स्थानिक भाषा आणि उत्पादनांना मोठी चालना मिळेल – केंद्रीय मंत्री पियुष गोयल

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी Develop a plan to curb counterfeit text about goods and products on e-commerce websites ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट मजकूरांवर अंकुश ठेवण्यासाठी आराखडा विकसित करणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की भविष्यातील ओएनडीसी म्हणजेच डिजिटल व्यापारासाठीचे खुले जाळे हा मंच म्हणजे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक परिवर्तनकारी इंजिन असेल.ओएनडीसी तर्फे आज नवी दिल्ली येथे “एनॅबलिंग भारत 2.0” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

ओएनडीसी आधारीत ई-वाणिज्य व्यासपीठांवर ग्राहकांसाठी अनेकविध पर्याय देणं शक्य होतं, ज्यामुळे स्पर्धात्मकता वाढून विक्रेत्यांसाठीही मोठी बाजारपेठ उपलब्ध होते असं गोयल यांनी सांगितलं. येत्या काळात ओएनडीसी प्रणाली जगभरातील परिवर्तनाचं कारक ठरणार आहे, त्यामुळे ई-वाणिज्य कंपन्यांनी ओएनडीसीत सहभागी होऊन, या नव्या बाजारपेठांचा भाग व्हावं असं आवाहन गोयल यांनी केलं.

ओएनडीसीमुळे आपल्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळून, छोट्या उद्योग व्यवसायांसाठी संधी निर्माण होतील, छोटे कारागीर आणि कामगार गुणवत्तापूर्ण सेवा देऊन चांगलं उत्पन् मिळवू शकतील. स्पर्धात्मकता वाढल्यानं त्याचा ग्राहकांनाही लाभ होईल आणि देशातल्या डिजीटल वाणिज्य परिसंस्थेच्या वाढीला मदत होईल असं ते म्हणाले.

ओएनडीसीमुळे ज्या विविध क्षेत्रांना लाभ होईल त्यांच्याबद्दल गोयल यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मोठ्या बाजारापर्यंत पोहोचता येईल आणि त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक चांगल्या दराची मागणी करता येईल, विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके आणि ऑनलाईन पद्धतीने चालवले जाणारे अभ्यासक्रम यांच्या शुल्कांची तुलना करता येईल, अमान्य लोकांना किफायतशीर दरात चांगल्या आरोग्य सुविधा मिळवता येतील, इत्यादी उदाहरणे त्यांनी दिली.

संभाव्य समन्वय शोधण्यासाठी तसेच विविध खुल्या प्रोटोकॉल सक्षम उपक्रमांशी असलेले सहकारी संबंध आणखी मजबूत करण्यासाठी तसेच विविध भागधारकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी “एनॅबलिंग भारत 2.0” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *