One should try to find a way out of the project by taking the locals into confidence
प्रकल्पासंदर्भात स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा – शरद पवार
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बरोबर शरद पवार यांची चर्चा
मुंबई : राज्यात कोणताही महत्त्वाचा प्रकल्प येत असताना स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे, तसंच प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
बारसू रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे, असेही पवार म्हणाले.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला त्यापार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बरोबर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आज शरद पवार यांची चर्चा झाली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी देखील त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
सामंत यांनी बारसू येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांची उद्या गुरुवारी (२७ एप्रिल) बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
कोकणामध्ये नवीन प्रकल्प येत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची कोणत्याही सरकारनं नोंद घेतली पाहिजे, असं पवार यावेळी म्हणाले. उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाला तर आनंद आहे परंतु त्यानंतरही काही निष्पन्न झालं नाही तर त्यावर मार्ग काढण्यासाठी अधिक चर्चा करता येईल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com