Sindhudurg MP Vinayak Raut arrested
सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना अटक
बारसू : सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना आज पोलिसांनी अटक केली. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी सुरुवातीला त्यांना प्रवेश नाकारला. पण आंदोलकांना भेटण्यासाठी राऊत अडून राहिल्यानं पोलिसांनी त्यांना बारसूमध्ये जाण्याची परवानगी दिली.
पण नंतर आंदोलनस्थळी तणाव वाढत गेल्याने पोलिसांनी विनायक राऊत यांना इतर काही जणांना अटक केल्याचं वृत्त आहे. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांवर कारवाईही केली. सरकार दडपशाही करत असून गावकऱ्यांना कोणतीही इजा होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं आवाहन विनायक राऊत यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील बारसू भागात रिफायनरीविरोधात स्थानिकांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विनायक राऊत जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतलंय.तर विनायक राऊत यांनी ट्वीट करत, “मला अटक केली आहे”, असा दावा केला आहे.
बारसू मधल्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, गावकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर केल्या जातील. सरकार चर्चेसाठी तयार आहे, सरकार गावकऱ्याबरोबर आहे, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. गावाबाहेरचे लोक तिथे आंदोलन करत असल्यानं आंदोलन चिघळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com