भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

Indian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

India will start its own heat index next year

भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

हा निर्देशांक तापमान आणि आर्द्रतेसह वारा आणि वादळाच्या स्थितीची माहिती देईल

नवी दिल्ली : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना, विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली.Indian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

हवेतली उष्णता निर्धारित करण्यासाठी हवेचं तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन, हवामान विभागानं गेल्या आठवड्यापासून देशाच्या विविध भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उष्णता निर्देशांक जारी करायला सुरुवात केली आहे, असं ते यावेळी म्हणाले.

उष्णता आणि आर्द्रता याबरोबर हवामान विभाग वारा आणि उष्णतेचा कालावधी, यासारखे अन्य घटकही यापुढे लक्षात घेणार असून, उष्णतेचा लोकांवर पडणारा प्रभाव सूचित करण्यासाठी ते महत्वाचे ठरतील, असं ते म्हणाले.

पुढल्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत उष्णता निर्देशांक जारी केला जाईल, आणि हा निर्देशांक तापमान आणि आर्द्रतेसह वारा आणि वादळाच्या स्थितीची माहिती देईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, आज सकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या विविध भागांमध्ये उथळ धुक्याचा थर दिसला, ज्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला.

काल शहरात जोरदार पाऊस झाला; गेल्या 24 तासात सुमारे 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

काल कमाल तापमान 30.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 9 अंशांनी कमी होते, तर किमान तापमान 20.1 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा पाच अंश कमी होते.

आज, हवामान विभागाने काही ठिकाणी रिमझिम पावसासह अंशतः ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे आणि कमाल आणि किमान तापमान 32 आणि 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *