I don’t think the Mahavikas Aghadi will crack over the question of NCP president: – Uddhav Thackeray
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडीला तडा जाईल असं वाटत नाही : उद्धव ठाकरे
पक्षात काय व्यवस्था आणायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला असतो
कार्यकर्त्यांचा नेत्यावर अधिकार असतो. त्यांना सर्वांचा हिताचा निर्णय घेऊ द्या. मी त्यांना सल्ला कसा देणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडीला तडा जाईल असं वाटत नसल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. पक्षात काय व्यवस्था आणायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्ष पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाल्यावर मी बोलेन, असं ते म्हणाले.
‘कार्यकर्त्यांचा नेत्यावर अधिकार असतो. त्यांना सर्वांचा हिताचा निर्णय घेऊ द्या. मी त्यांना सल्ला कसा देणार आहे. सल्ला पचनी नाही पडला तर, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाच सविस्तर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वेट अँड वॉचचा सल्लाही दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणताचा विचार दिल्लीतल्या नेत्यांच्या मनात नसल्याचं शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेत म्हटलं आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता मी माझ्या मतावर ठाम आहे. पण, महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कोणतीही विधानं आपण करणार नसल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
वज्रमूठ सभांचा कार्यक्रम मे अखेर किंवा जूनपर्यंत करायचं ठरवलं होतं. पण खारघर घटनेनंतर थोडा विचार बदलला. नंतर या सभांचं नियोजन केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बारसुचा दौरा हा माझ्या लोकांना भेटण्यासाठी आहे. ‘मी त्यांचा हिम्मत पाहायला तयार नाही. मी माझ्या लोकांना भेटायला जातोय. या प्रकल्पाबाबत विचित्र मते तयार आहे. रिफायनरीचे प्रदूषण मला परवडणारे नाही. माझे पत्र नाचवता, पण माझ्या काळात येणारे प्रकल्प का वळवले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
डोक्यावर बंदूक टेकवून तुम्ही प्रकल्प लादू नका. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढला होता. आता मोदींनी बजरंगबली की जय म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कायद्यात बदल केला का?, असा सवाल त्यांन आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com