शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द

Sharad Pawar's decision to quit the post of NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Sharad Pawar’s decision to resign as NCP president cancelled

शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयापासून शरद पवार परावृत्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.

Sharad Pawar Senior Leader . Chief Nationalist Congress Party हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आपण मागं घेत असल्याचं शरद पवार यांनी आज जाहीर केलं. शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”

देशभरातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य चाहते यांनी प्रेम आणि विश्वास व्यक्त करत एकमुखाने माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. ‘लोक माझे सांगाती’ यावर आपला कायम भर राहिला आहे, सामाजिक भावनेचा अनादर आपल्याकडून होऊ शकत नाही, त्यामुळे आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं, तसंच राजीनाम्याची कल्पना सर्व सहकाऱ्यांना दिली नाही त्याबद्दल आपण त्यांची माफी मागत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

यापुढे कोणतंही जबाबदारीच पद घेणार नसून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचवण्यासाठी अधिक जोमानं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षात नवं नेतृत्व घडवणं गरजेचं असून, त्यादृष्टीनं पक्षात संघटनात्मक बदल करणार असल्याचं ते म्हणाले.

त्याआधी सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि अध्यक्षपदी कायम रहावं, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निर्णयासाठी नेमलेल्या समितीनं मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व १७ नेत्यांनी या प्रस्तावाला एकमुखानं पाठिंबा दिला.

उत्तराधिकारी कोण असणार?

“उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण उत्तराधिकारी राजकीय पक्ष ठरवत नसतात. लोक एकत्र काम करतात. सर्व सहकारी म्हणून काम करतात. हा कुणा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “उत्तराधिकारी ही कन्सेप्ट त्यातली नाही. पण एक गोष्ट माझ्या मनात आहे. ती मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन आणि चर्चा करेल की, राजकारणात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“उदाहरणार्थ जे जिल्हा पातळीवर दहा ते पंधरा वर्ष काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे की राज्य पातळीवर काम करु शकतात. जे राज्य पातळीवर काम करतात ते राष्ट्रीय पातळीवर काम करु शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि पक्षातील सहकाऱ्यांची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्थिरतेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या राजीनामानाट्यावर मोठं विधान केलं आहे. शरद पवारांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत चित्रपट आहे, असं विधान फडणवीसांनी केलं. ते कर्नाटकमधील हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्थिरतेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहेत. त्यांची पटकथाही अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत चित्रपटाचा शेवट होत नाही. तोपर्यंत आम्ही यावर काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल, तेव्हा यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ…”

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *