Take a trip to the Science Park in the university during the summer vacation..!!
उन्हाळ्याच्या सुट्टीत करा विद्यापीठातील सायन्स पार्क ची सफर..!!
बच्चे कंपनीसाठी एक व दोनदिवसीय समर कॅम्प चे आयोजन
या कॅम्प मध्ये विद्यापीठ परिसरात निसर्ग भ्रमंती, विज्ञान खेळ, रसायनशास्त्र, बागकाम, खगोलशास्त्र, गणित आणि जैवशस्त्र, विज्ञान खेळणी, तज्ज्ञांशी चर्चा
पुणे : कोणाला बागकामाची आवड असते तर कोणाला ग्रह ताऱ्यांचं कुतूहल असतं, कोणाला गणित आवडतं तर कोणी विज्ञानातले प्रयोग करण्यास इच्छुक असतं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड आणि शिक्षण याची सांगड घालत नवे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकशन’ म्हणजेच सायन्स पार्क तर्फे २ मे ते २४ मे दरम्यान समर कॅम्प २०२३ चे आयोजन केले आहे.
बच्चे कंपनीची शाळेची सुटी सुरू झाली आहे. ही सुटी मजेत तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवण्यासाठी उत्तम पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. इयत्ता दुसरी पासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती सायन्स पार्कचे समन्वयक डॉ.रा.ल.देवपूरकर यांनी दिली.
२ मे ते २४ मे या कालावधीत एक दिवसीय कॅम्प होत आहे तर दोन दिवसीय कॅम्प ८ ते २३ मे या कालावधीत होणार आहे. यासाठीची सर्व माहिती कॅम्पच्या तारखा तसेच यासाठीचे शुल्क विद्यापीठाच्या sciencepark.unipune.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.
या कॅम्प मध्ये विद्यापीठ परिसरात निसर्ग भ्रमंती, विज्ञान खेळ, रसायनशास्त्र, बागकाम, खगोलशास्त्र, गणित आणि जैवशस्त्र, विज्ञान खेळणी, तज्ज्ञांशी चर्चा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
यासाठी नावनोंदणी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संकेतस्थळावर जात यासाठी नोंदणी करावी ही विनंती.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com