भारतीय हवाई दलाच्या मिग 21 विमानाला (MiG 21 aircraft ) अपघात

Indian Air Force MiG-21 trainer fighter jet crashes भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाला अपघात हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Indian Air Force MiG 21 aircraft crashes

भारतीय हवाई दलाच्या मिग 21 विमानाला अपघात

विमानाला राजस्थानच्या हनुमानगडजवळ अपघात

विमान कोसळले आणि एका घरावर पडले

या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे

Indian Air Force MiG-21 trainer fighter jet crashes भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाला अपघात हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विमान मिग-21 लढाऊ विमानाला राजस्थानच्या हनुमानगडजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान आज सकाळी 0945 च्या सुमाराला कोसळले. भारतीय हवाई दलाच्या सुरतगढ येथील तळावरून या विमानाने रोजच्या नियमित प्रशिक्षणाअंतर्गत फेरी मारण्यासाठी उड्डाण केले होते. त्यानंतर लगेचच आपत्कालीन स्थिती उद्भवली. त्यानंतर वैमानिकाने प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार विमानाला पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर त्याने विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. सुरतगढच्या ईशान्येला 25 किलोमीटर अंतरावर वैमानिकाला जखमी अवस्थेतून बाहेर काढण्यात आले.

अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा हनुमानगढ जिल्ह्यातील बहलोल नगर येथील एका घरावर कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यु झाला. भारतीय हवाई दलाने जीवितहानीबद्दल खेद व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास लावण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी जानेवारीच्या सुरुवातीला राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान सुखोई एसयू-३० आणि मिराज २००० ही दोन भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने कोसळली होती. या अपघातात पायलटला आपला जीव गमवावा लागला. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळले होते. तर, दुसरे विमान राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर आली होती.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *