जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस

NCP State President Jayant Patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

NCP state president Jayant Patil has been notified by the enforcement directorate

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीसNCP State President Jayant Patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळी आपल्याला ही नोटीस मिळाली अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. ही नोटीस देण्यामागचं कारण, नोटीशीत नाही, मात्र आयएलएफएस या कंपनीचा त्यात उल्लेख असून, या कंपनीसोबत आपला कधीही संबंध आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

2018 मध्ये दिवाळखोरीसाठी दाखल केलेल्या IL&FS द्वारे कोहिनूर CTNL ला दिलेल्या संशयास्पद कर्जामध्ये NCP महाराष्ट्र प्रमुखाच्या कथित सहभागाची ईडी चौकशी करत आहे.

आयएल ॲंन्ड एफसी कंपनी प्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या नोटीशीनुसार आपण चौकशीला सामोरं जाऊ, मात्र पुढचे काही दिवस कुटुंबात लग्नकार्य असल्यानं, काही दिवसांचा वेळ द्यावा असं पत्र आपण सक्तवसुली संचालनालयाला दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांची यापूर्वी ईडीने कधीही चौकशी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्रास देण्याचे काम भाजपने सुरु केल्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार विद्या चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची नोटीस येण्यात आता काही नाविन्य राहिलेले नाही. शरद पवारांपासून सर्वांनाच नोटीशी आल्या आहेत. यातून राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होईल असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी 2018 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.

बुधवारी, एजन्सीने IL&FS – BSR आणि असोसिएट्स आणि Deloitte Haskins and Sells च्या दोन माजी ऑडिटर फर्म्स विरुद्ध देखील शोध घेतला.

ED ने 2019 मध्ये IL&FS मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) प्रथम माहिती अहवालाच्या आधारे सुरू केली. एजन्सीने ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची या प्रकरणासंदर्भात चौकशी केली.

2005 मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बिल्डर राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. 3 आणि कोहिनूर CTNL ची स्थापना केली. ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले. IL&FS च्या विविध कर्जांमध्ये कथित घोर अनियमितता समोर आल्यानंतर हा करार ईडीच्या स्कॅनरखाली आला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *