In the last nine years, 238 antiquities were brought back to India
गेल्या नऊ वर्षात, 238 प्राचीन वस्तू भारतात परत आणल्या गेल्या
भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे पुनरुज्जीवन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जगभरात असलेल्या भारताच्या पुरातन वस्तू आणि प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यास वचनबद्ध आहे. कित्येक शतकांपासून अशा मौल्यवान कलाकृती, ज्यांना खूप मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे, अशा वस्तू चोरीला गेल्या होत्या किंवा त्यांची तस्करी झाली होती.
केंद्र सरकारने भारताचा हा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा भारतात परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या अनेक परदेश ऱ्यांमध्ये, पंतप्रधानांनी स्वतःच, ह्या मुद्यावर, जागतिक नेत्यांशी आणि बहुराष्ट्रीय संस्थांशी चर्चा केली होती.
24 एप्रिल 2023 पर्यंत, 251 मूळ भारतीय कलाकृती आणि वस्तू विविध देशांमधून परत आणण्यात आल्या आहेत. त्यापैकी, 238 वस्तू 2014 नंतर आणण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, आणखी 72 कलाकृती विविध देशातून परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ह्या वस्तू परत आणण्यासाठी, भारत सरकार अथक परिश्रम करत असून, त्या प्रयत्नांचाच परिणाम म्हणून, आपल्या ह्या मौल्यवान कलाकृती आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचा मूर्तिमंत वारसा आपल्याला परत मिळतो आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com