Under the ‘One Station One Product’ scheme, 785 sales centres were opened at railway stations across the country
वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजने अंतर्गत देशभरात रेल्वे स्थानकांवर उघडण्यात आली 785 विक्री केंद्रे
वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजने अंतर्गत देशभरातील 21 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 728 रेल्वे स्थानकांवर उघडण्यात आली 785 विक्री केंद्रे
‘वोकल फॉर लोकल’ दृष्टीकोनाला चालना देणे आणि स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे योजनेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : भारत सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’ या दृष्टीकोनाला चालना देणे, स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या वंचित घटकासाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेच्या स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ (ओएसओपी), अर्थात एक स्थानक एक उत्पादन योजना सुरू केली आहे.
या योजने अंतर्गत, स्वदेशी/स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री आणि त्याला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ विक्री केंद्रांसाठी जागा देण्यात अली आहे.
25.03.2022 रोजी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात आली होती, आणि 01.05.2023 पर्यंत, देशभरातील 21 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 728 रेल्वे स्थानकांवर एकूण 785 ओएसओपी विक्री केंद्रे उघडण्यात आली आहेत. नॅशनल डिझाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ओएसओपी केंद्रांची एक-समान रचना करण्यात आली आहे.
‘एक स्थानक एक उत्पादन’ हे संबंधित ठिकाणची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने विक्रेसाठी उपलब्ध करत असून, यामध्ये त्या प्रदेशातील आदिवासी जमातींनी बनवलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांनी बनवलेली हातमाग वस्त्रे, जगप्रसिद्ध लाकडावरील कोरीवकाम, चिकनकारी आणि जरी-जरदोजी यासारखे कपड्यावरील कलाकुसरीचे काम, अथवा त्या प्रदेशात उत्पादन केलेले मसाले चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले/अर्ध प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ/उत्पादने यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत उत्पादन श्रेणींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:-
- 1.हस्तकला/कलाकुसरीच्या वस्तू
- 2.कापड आणि हातमाग वस्त्रे
- 3.पारंपरिक वस्त्रे
- 4.स्थानिक कृषी उत्पादन (भरड धान्यांसह)/ प्रक्रिया केलेले/अर्ध प्रक्रिया केलेले अन्न.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com