Counting of Karnataka assembly elections tomorrow
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या224 जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होत आहे
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या 224 जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होत आहे. राज्यभरात 34 मतमोजणी केंद्रे असून त्यापैकी पाच बेंगळुरूमध्ये आहेत जिथे सकाळी 8.00 वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक आयोगाने सर्व मतमोजणी केंद्रांवर विशेष मतमोजणी निरीक्षक नेमले आहेत. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी करण्यात येणार असून प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे.
या 34 मतमोजणी केंद्रांवरील 306 हॉलमधील 4256 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी 224 निवडणूक अधिकारी आणि 317 सहायक निवडणूक अधिकारी असतील. या मतमोजणी केंद्रांवर 4256 मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक देखील असतील. मतमोजणी केंद्रांभोवती तीन स्तरांवर सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या मतदानात 73 पूर्णांक 19 शतांश टक्के मतदान झालं होतं. उद्या सर्वसाधारण मतमोजणी प्रक्रियेनुसार मतमोजणी होईल.
आयोगाने निकाल आणि ट्रेंड अपडेट देण्याची व्यवस्था
ceokarnataka.gov.in आणि वर results.eci.gov.in या वेबसाइटवर केली आहे
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com